दुर्दैवी घटना! कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू – tragic incident building staffer falls to death in bid to save crow in phoenix mall lower parel mumbai
मुंबईत एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबईतील लोअर परळ भागात फिनिक्स मॉलमध्ये ही घटना घडली. या घटनेत एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कावळ्याचा वाचण्यासाठी तो गेला होता.
दुर्दैवी घटना! कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : इमारतीच्या बाहेरील बाजूस अडकलेल्या कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एका २०वर्षीय तरुणाने प्राण गमावल्याची घटना बुधवारी लोअर परळ येथील फिनिक्स मॉलमध्ये घडली. समीर वाघरी असे मृत तरुणाचे नाव असून, याबाबत ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीत काम करणाऱ्या समीर याची नेमणूक फिनिक्स मॉलमध्ये होती. मॉलमधील पॅलेडियमच्या पी-६ या सहाव्या मजल्यावरील पार्किंगच्या बाहेरील बाजूस बुधवारी कावळा अडकल्याचे काही जणांनी पाहिले. इमारतीच्या बाहेरच्या बाजूस अडकलेल्या कावळ्याला काढण्यासाठी समीर गॅलरीच्या भागात उतरला. कावळा काढताना तोल गेल्याने समीर सहाव्या मजल्यावरून खाली कोसळला. या ठिकाणी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याला नायर रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच समीरचा मृत्यू झाला होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : tragic incident building staffer falls to death in bid to save crow in phoenix mall lower parel mumbai Marathi News from Maharashtra Times, TIL Network