मुंबई: बंगाली सिनेसृष्टीला हादरवून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. आणखी एका बंगाली अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १५ दिवसांत तीन अभिनेत्रींनी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं बंगाली सिनेसृष्टी हादरली आहे.

बंगाली सिनेअभिनेत्री आणि मॉडेल मंजूषा नियोगी हिनं आज राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंजूषाच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिस या प्रकणाचा तपास करत आहे.
प्रियकरामुळे जीव गमावला! अभिनेत्रीने गळफास घेऊन केली आत्महत्या, मिळाली सुसाइड नोट
गेल्या तीन दिवसांत दोन अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे, तर १५ दिवसांतील ही तिसरी आत्महत्या आहे. छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री पल्लवी डे हिनं १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. राहत्या घरी तिनं गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली . पल्लवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता.त्यानंतर पोलिसांनी पल्लवीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं होतं. पल्लवी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्हइनमध्ये राहत होती.
Prajakta Mali: इतर सीरिजमधील बोल्ड सीनबद्दल काय म्हणाली होती प्राजक्ता? वाचून विश्वास बसणार नाही
दोन दिवसांपूर्वी २१ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजूमदार हिनंही राहत्या घरी आत्महत्या केली होती. गळफास लावून बिदिशानं तिचं आयुष्य संपवलं.

बॉयफ्रेंडमुळेच आत्महत्या
बिदिशाच्या मित्र- मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, ती प्रियकरामुळं डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाची सर्वात जवळची मैत्रीण दिया दासने सांगितलं की ती नैराश्यात होती. बिदिशाचा प्रियकर अनुभबच्या आणखीन तीन प्रेयसी होत्या आणि बिदिशाला त्याला कोणासोबतही शेअर करायचं नव्हतं. ती याच गोष्टीमुळे नैराश्यात होती. आपल्या सुसाइड नोटमध्ये अभिनेत्रीने ती कर्करोगग्रस्त असल्याचंही लिहिलं. पण तिला कोणताही कर्करोग नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here