नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार, देशात आंतरराज वाहतूक करणारे ३.५ लाख ट्रक ३५ हजार कोटी रुपये किंमतीच्या वस्तू घेऊन रस्त्याने उभ्या आहेत. चालकांना खाण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येकाने घर जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचा माल वाया जाण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, ट्रकांच्या वाहतुकीला परवानगी द्यावी, असा आदेश केंद्राने दिला असला तरी पोलिसांकडून अडवणूक होत असल्याची तक्रार वाहतूक संघटना करत आहेत.
अचानक ओढावलेल्या या संकटामुळे ट्रक मालक पुरते संकटात सापडले आहेत. ट्रकांचे हफ्ते, देखभाल खर्च हे सर्व सुरूच आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी, अशी मागणी अशी नुकतीच वाहतूक संघटनेने केली होती.
२० एप्रिलपासून काय सुरू आणि काय बंद?
सुरू
– जीवनावश्यक, अनावश्यक वस्तूंच्या मालवाहू ट्रका, हायवे ढाबा, ट्रकांची गॅरेज
– शेतीसंबंधी कामे, खत, कीटकनाशक दुकाने, शेती साहित्य यांचा पुरवठा
– मत्स्य व्यवसाय
– ग्रामीण भागातील उद्योग, रस्ते काम, सिंचन प्रकल्प
– ग्रामीण भागातील बांधकामे, मनरेगा कामे
– SEZ मधील निर्मिती कंपन्या, जीवनावश्यक वस्तूंची पॅकेजिंग
– कोल्ड स्टोरेज सेवा
– वित्तीय सेवा
– आयटी सेवा, डिजीटल व्यवहार, कॉल सेंटर्स, सरकारी कार्यालये, ऑनलाईन शिक्षण
– कुरियर सेवा
– सर्व आरोग्य सेवा
– लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी लॉजिंग, हॉटेल
– इलेक्ट्रिशियन, रिपेअर्स, प्लंबर अशा सेवा
बंद
– सिनेमागृहे, मॉल्स, आदरातिथ्य सेवा
– सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम
– रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक
– शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times