‘युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?’
भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत बंद खोलीत दिलेला शब्द मोडल्याने आम्ही युतीतून बाहेर पडत आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घेतली होती. उद्धव ठाकरे यांना याच भूमिकेची आठवण करून देताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ‘राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या टीकेला शिवसेनेकडून कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘चंपावाणीचा जाहिर निषेध’ म्हणत राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार