काय आहे प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद राफेउद्दीन उर्फ राफे सलाउद्दीन याने हिरोगिरी करत तलवार हातात घेऊन फोटोसेशन केले होते. वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. पोस्ट बाबत पोलिसांना माहिती मिळालेली होती. त्यावरून त्याचा शोध सुरु करण्यात आला.
संशयास्पद तरुणाची अंंगझडती
या व्हायरल दादाची शोधाशोध सुरु असतानाच तो हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाला मिळाली होती. या पथकाने संशयास्पदरित्या उभा असलेला एक युवक दिसल्यानंतर त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे धारदार तलवार आढळली. मोहम्मद राफेउद्दीन उर्फ राफे सलाउद्दीन विरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा सिटी चौक ठाण्यात नोंदविण्यात आला.
ऑनलाईन तलवारी प्रकरणावरून पोलिसांचा वॉच
शहरात कुरिअर द्वारे ऑनलाईन तलवारी मागवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवणे सुरू केले आहे. शहरातील अनेक भागात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हत्यारासहित गुन्हेगार फोटो पोस्ट करत आहेत. अशा सोशल मीडियाच्या स्वयंघोषित दादांवर आता पोलीस कारवाई करताना दिसत आहेत.
उल्हासनगरचा बॉडीबिल्डर जगात भारी, ‘मिस्टर वर्ल्ड’ साठी झाली निवड