मुंबई: नेहमीच चर्चेत असणारं बॉलिवूडमधील नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत. कंगना तिच्या चित्रपटांमुळं तर चर्चेत असतेच, पण तिच्या वादग्रस्त पोस्ट आणि वक्तव्यांमुळं देखील. कंगनाचा ‘धाकड‘ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. पण बॉक्सऑफिसवर हा चित्रपट धाडकन आपटला आहे.
धाकड फ्लॉप झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कंगनाला प्रचंड ट्रोल केलं आहे. गेल्या एक -दोन वर्षात कंगना विरुद्ध बॉलिवूड असं चित्र उभं राहिलं आहे. कंगनानं आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. कंगनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत ती पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांवर बोलताना दिसत आहे.
कंगनाचा एक व्हिडिओ चॅट शोचा आहे. या मध्ये तिला बॉलिवूडमधील तिच्या मित्र-मैत्रिणींविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. तू तुझ्या घरी बॉलिवूडमधील कोणत्या तीन मित्र किंवा मैत्रिणींना जेवणाचं आमंत्रण देशील? असा प्रश्न विचारल्यानंतर कंगनानं नेहमीप्रमाणे तिरकस असं उत्तर दिलं.

माझ्या घरी मी कोणाला आमंत्रण द्याव ,त्यांची सेवा करावी, या लायक तरी कोण नाहीये. घरी तर बोलवूच नका. बाहेर भेटा आणि तिथंच सोडा. माझ्याशी मैत्री करण्यालायक नाहीत हे लोक. पात्रता हवी त्याच्यासाठी’, असं कंगना हसत हसत बोलताना दिसत आहे.