मुंबई: काही महिन्यांपूर्वी कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रचंड गाजावाजा करत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यामुळं शाहरुखचे चाहते सध्या आनंदात आहेत.

किंग खानच्या लेकाला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक ट्रेंड सुरू झाले होते. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत, असं त्याचे चाहते त्याला सांगत होते. आर्यनला क्लिनचीट मिळाल्यानंतरही आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

१२ दिवसांत ३ मृतदेह! पल्लवी, बिदिशानंतर आता मंजूषा, सिनेसृष्टीला कोणाची लागली नजर?
आर्यनला अटक झाल्यानंतर त्याचा हा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत तो हसताना दिसतोय. हे हास्य एनसीबीचे अधिकारी आणि वानखेडे आयुष्यभर विसणार नाहीत, असं एकानं म्हटलं आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं (SIT) आर्यन खान याच्याकडं त्यावेळी ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा अहवाल दिला होता. त्यामुळं अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आर्यन याच्याकडं ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला होता.

आर्यनला क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असं एनसीबीनं म्हटलय. या आरोपपत्रात एनसीबीनं एनडीपीएस कायद्यातंर्गत एकूण १४ जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला होता. तर उर्वरित सहा जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here