आर्यन खानला क्लिनचिट मिळताच समीर वानखेडे म्हणाले ‘सॉरी’!
शाहरुख खाननं ९ वर्षापूर्वी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यानं म्हटलं होतं की, त्याला पोर्न स्टार व्हायचं होतं. त्याला अॅडल्ट फिल्ममध्ये काम करायचं होतं. एवढ्या मोठ्या कलाकाराला असं का करायचं होतं, हा प्रश्न फॅन्सना पडला. त्या मागचं कारणही रंजक आहे.
जगातला मोठा पोर्न स्टार व्हायचं होतं

शाहरुखनं मुलाखतीत सांगितलं की त्याला पोर्न स्टार व्हायचं होतं. त्यामागचं कारणही त्यानं सांगितलं. तो म्हणाला, ‘मी नेहमीच सिल्वेस्टर स्टेलाॅनचा फॅन होतो. तो हाॅलिवूडचा सुपरस्टार होण्याआधी पोर्न स्टार होता.’ शाहरुख खाननं पुढे सांगितलं, ‘मी जगातला सर्वात मोठा पोर्न स्टार झाल्यावर अमेरिकेत आपला झेंडा फलकावला असता.’
आर्यन खानला क्लिनचीट मिळाल्यानंतर नेटकऱ्यांचा वानखेडेंना टोला
सिल्वेस्टर स्टेलाॅनचा प्रभाव होता शाहरुखवर

सिल्वेस्टर स्टेलाॅन हाॅलिवूडचा अभिनेता. अनेकांना तो प्रभावित करतो. शाहरुख खाननंही त्याच्याकडूनच प्रेरणा घेतली होती. जन्मताच सिल्वेस्टरच्या चेहऱ्याच्या एका भागाला पॅरेलेसिस झाला होता. त्याला बोलताना त्रास होत असे. त्यानं आपलं सर्व लक्ष बाॅडी बिल्डिंग आणि अभिनयाकडे दिलं. अनेकदा त्याला नकार मिळाला होता. १९७० मध्ये त्यानं पहिल्या अॅडल्ट फिल्ममध्ये काम केलं. त्यावेळी तो रहात होता तिथून त्याला काढून टाकलं. तीन आठवडे सिल्वेस्टर बस टर्मिनलमध्ये झोपायचा. खूप संघर्ष केल्यानंतर त्याचा राॅकी सिनेमा हिट झाला आणि मग त्यानं मागे वळून पाहिलंही नाही.
शाहरुखचे येणारे सिनेमे
शाहरुख खान पठाण सिनेमात बिझी आहे. या सिनेमात त्याच्या बरोबर दीपिका पादुकोण आणी जाॅन अब्राहम आहे. राजकुमार हिरानीबरोबरही तो डंकी सिनेमा करत आहे.