औरंगाबाद : उस्मानाबादच्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून आज रिपब्लिकन सेना आणि उस्मानाबादच्या उपकेंद्राचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यात झटापट झाली. यादरम्यान, निंबाळकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून आज वाद झाला. मागणी करणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी हा विद्यापीठ विभाजनाचा घाट असल्याचा आरोप करीत व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाबाहेर शाईफेक केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतर शहिदांच्या बलिदानाचा हा एक प्रकारे अवमान करूम राज्यात दंगली पेटविण्याचे जातीयवादी षडयंत्र हणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारू प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे संजय निंबाळकरसारख्या प्रवृत्तींना धडा शिकवून विभाजन हणून पाडू, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी दिली.