एक गाव, गावतील काही माणसं, ग्रामपंचाय आणि तिथलं राजकार सहज सोपी ही ” प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. या सीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला. दुसरा सीझनहा पहिल्या सीझनपेक्षाही भारी असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
” प्रदर्शित झाल्यानंतर सीरिजची चर्चा सुरु झाली. या सीरिजमध्ये अभिनेता जितेंद्र कुमारनं मुख्य भूमिका साकारली आहे. प्रेक्षक त्याच्या सहज-सुंदर अभिनयाच्या प्रेमात पडले आहेत. त्यानं फुलेरा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातील सचिव अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली आहे.
जितेंद्र खऱ्या आयुष्यात इंजिनीअर असून तो आयआयटीचा विद्यार्थी होता. अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरवल्यानंतर घरच्यांकडून त्याला विरोध होता. परंतु दोन दिवस उपाशी राहिल्यानंतर वडिलांचा राग कमी झाला आणि त्यांनी होकार दिला, अशा अनेक गोष्टी जितेंद्रनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेअर केल्या आहेत.
‘गरीब रथ’ गाडीनं त्यानं पहिल्यांदा मुंबई गाठली. ‘ ‘गरीब रथ’ रेल्वेनं पहिल्यांदा मुंबईत बांद्रा स्टेशनवर उतरलो. स्टेशनच्या बाहेर पडायलाच मला अर्धा तास लागला, असं जितेंद्रनं सांगितलं. अभिनयाच्या क्षेत्रात पैसे कमवायचं म्हणजे सोपं काम नव्हे, त्यासाठी तुम्हाला संयम ठेवाला लागतो.
अभिनय करायचा होता, पण मुंबईत राहणचं म्हणजे पैसे हवेत. ‘घरातून पैसे पाठवू नका, असं मी त्यांना सांगितलं होतं’, त्यामुळं सुरुवातीच्या काळात मी फिजिक्सचे क्लासेस घेतले,असं जितेंद्र म्हणाला.
जितू भैय्याही प्रेक्षकांना भावला‘कोटा फॅक्टरी’ सीरिजच्या पहिल्या सीझनमझ्ये मध्ये शिक्षकासह मार्गदर्शकाची भूमिका निभावणारा जितू भैय्या प्रेक्षकांना भावला. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध टप्प्यावर जितू भैय्यासारखी व्यक्ती भेटत असते आणि पुढचा मार्ग सुकर करत असते. प्रेक्षकांनी जितू भैय्याचं पात्र रिलेट केलं. जितू भैय्यानं सांगितलेले जीवनमंत्र आजही प्रेरणादायी कोट स्वरुपात व्हायरल होत आहेत.