हिंगोली : वसमत तालुक्यातील विरेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीमुळे आत्महत्येचे गूढ उकलले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलिस ठाण्यात गुरुवारी ( ता. २६ मे) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील विरेगाव येथील नारायण उर्फ गुलाब सोपान लोखंडे (वय ४५ वर्ष) यांनी गुरुवारी (ता. १९ मे) विरेगाव शिवारात शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.
24 वर्षांचा संसार मोडला, बायकोच्या हत्येनंतर नवरा कोलमडला, हार्ट अटॅकने मृत्यू
हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक ए. एस. पठाण, उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार भुजंग कोकरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या

दरम्यान, मयत नारायण उर्फ गुलाब यांच्या खिशात चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये गावातील दिगंबर नामदेव मिरासे यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. त्यामुळे पोलिसांनी चिठ्ठीवरील हस्ताक्षर आणि स्वाक्षरी यांची पडताळणी केली.

दगडूशेठला बाहेरुनच हात जोडले, पवार म्हणतात, नॉनव्हेज खालल्याने बाहेरुनच दर्शन
संशयिताला घेतले ताब्यात

सदर हस्ताक्षर लोखंडे यांचेच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रमेश सोपानराव नरवाडे यांनी गुरुवारी रात्री हट्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दिगंबर मिरासे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोदे, उपनिरीक्षक पठाण पुढील तपास करीत आहेत.

प्रत्येक नेता गडकरींचा चाहता, वाढदिवसानिमित्त संजय राऊतांनी केलं कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here