Pune News: पुणे तिथे काय उणे, असं कायमच म्हटलं जातं. पुणेकरांच्या आयडिया, पुणेकरांच्या गोष्टी भन्नाट असतात. ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं पुणे विद्यापीठाला म्हटलं जातं. याच पुणे विद्यापीठात एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या लाडका असलेला ‘खंडू’ नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘खंडू’ नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. यसाठी तीन दिवसांपूर्वी फ्लेक्स लावण्यात आला होता. मोठा केक कापून फटाके फोडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे ‘खंडू’ नावाच्या कुत्र्याची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

पुणे विद्यापीठात ‘खंडू’ नावाचा कुत्रा चांगलाच प्रचलित आहे. याआधी देखील त्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांपासून वाचवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या ‘खंडू’वर विशेष प्रेम आहे.पुणे विद्यापीठाचा ‘जिगरबाज’, ‘धाडसी’ आणि ‘कर्तव्यदक्ष’, अशी या खंडूची ओळख आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस सगळ्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा करण्याचं ठरवलं होतं. या वेळी एक फ्लेक्स लावण्यात आला होता आणि त्या फ्लेक्सची चर्चा सगळ्या विद्यापीठात  होती. विद्यार्थ्याने असा अनोखा वाढदिवस साजरा केल्यामुळे विद्यापीठात चांगलीच चर्चा रंगली. याआधी देखील खंडूने अनेकदा विद्यार्थ्यांची मदत केली आहे. विद्यापीठाचा परिसर दाटीवाटीत असल्याने तिथे कायम साप आढळतात. अनेक विद्यार्थ्यांना संर्पदंशही झाला आहे. मात्र खंडू च्या सतर्कतेमुळे सर्पदंश याचा धोका कायम टळला आहे.

तीन वर्ष होतोय वाढदिवस साजरा-
अविनाश शेंबटवाड या विद्यार्थ्याने वसतीगृहात हा खंडू आणला होता. त्यानंतर त्याचे मित्र असलेल्या विनोद वाघ, योगेश सोनावणे, दयानंद शिंदे, सुरज गुत्ती यांनी देखील खंडूचा सांभाळ केला. गेले तीन वर्ष झाले हे सगळे खंडूचा वाढदिवस जल्लोषात साजरा करत आहेत. अविनाश शेंबटवाड हे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात तहसिलदार आहेत.त्यांनी सांभाळलेल्या खंडूने अनेकांची मदत केली आहे.

‘खंडू’चं इंस्टाग्राम अकाउंट 

आतापर्यंत आपण अनेकांचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले असतील. आपल्या अनेकांचे देखील इंस्टाग्राम अकाउंट आहेत मात्र पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या ‘खंडू’ नावाच्या कुत्र्याचं इंस्टाग्राम अकाउंट काढले आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर खंडूचे अनेक वेगवेगळे फोटोसुद्धा दिसेल. त्यांने केलेली मदत आणि त्यांनी दाखवलेली सतर्कता यावर आजपर्यंत अनेक बातम्या झाल्या आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here