सागर: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात गुरुवारी एक अजब घटना घडली. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत मिळणाऱ्या लाभाच्या लालसेपोटी एनएसयूआयच्या राष्ट्रीय समन्वयकानं दुसऱ्यांदा विवाह केला. विशेष म्हणजे त्याचा पहिला विवाह १५ दिवसांपूर्वीच झाला होता. नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. यावरून भाजपनं काँग्रेसला टोला लगावला आहे.

गुरुवारी सागरमधील बालाजी मंदिर परिसरात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात १३५ जोडप्यांनी विवाह केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक नैतिक चौधरी यांना मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ होता. त्यामुळे नैतिक चौधरी पत्नीला घेऊन दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याला पोहोचले. नैतिक चौधरींना मंडपात पाहून कोणीतरी याची माहिती आयोजकांना दिली. त्यानंतर आयोजकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं सोहळ्यास्थळी येऊन नैतिक चौधरींना ताब्यात घेतलं.
लडाखमध्ये मोठी दुर्घटना! लष्करी जवानांची बस नदीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
नैतिक चौधरींना पोलीस ठाण्यात नेलं. नैतिक चौधरींचा विवाह दोनच आठवड्यापूर्वी धूमधडाक्यात संपन्न झाला. पोलीस नैतिक यांना पोलीस ठाण्यात नेत असताना पत्नीदेखील त्यांच्यामागे धावली. दुसऱ्यांदा विवाह करायला नको, असं पत्नीनं नैतिक यांना सांगितलं होतं. पोलीस आता नैतिक चौधरींची चौकशी करत आहेत.

या प्रकरणावरून मध्य प्रदेश भाजपचे माध्यम प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला. ‘हे श्रीमान एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. मुख्यमंत्री कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्यांदा विवाह करण्यास जात होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काय म्हणता कमलनाथजी!,’ असा टोला पराशर यांनी लगावला.

‘या’ जोडप्यानं एकाच दिवशी दोनदा लग्न का केलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here