मुंबई- यांना काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार म्हणून एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली. ही रक्कम त्यांनी सामाजिक संस्थेला दान करण्यास सांगितले होते. त्यानुसार यांनी या पुरस्काराची रक्कम पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा केली आहे.

पंतप्रधानांनी हृदयनाथ मंगेशकर यांना सांगितलं होतं की, पुरस्कारपोटी मिळालेली धनराशी सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला देणगी म्हणून द्या. यासंदर्भात हृदयनाथ मंगेशकर यांनी ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिळालेल्या पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची रक्कम सामाजिक संस्थेला दान करा असं सांगितलं होतं. त्यांचा हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यामुळे या पुरस्काराची जी रक्कम आहे ती आम्ही पंतप्रधान सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.’

६ फेब्रुवारी रोजी लता मंगेशकरांचं झालं होतं निधन
गानसम्राज्ञी यांचं ६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. जानेवीर २०२२ मध्ये त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांची तब्येत ढासळत गेली. लतादीदींवर सुमारे एक महिना रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटवर ठेवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचं खूप दृढ नातं होतं. लतादीदी मोदींना भाऊ मानायच्या. इतकंच नाही तर दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना राखीदेखील पाठवायच्या. पंतप्रधानही लतादीदींच्या वाढदिवसाला आवर्जून फोन करून त्यांना शुभेच्छा द्यायचे.

पुरस्कार घेताना पंतप्रधान झाले होते भावुक

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खूपच भावुक झाले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी हृदयनाथ यांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांनी या पत्रात लिहिलं होतं की, ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी मला बोलावल्याबद्दल मंगेशकर कुटुंबाचे मी मनापासून आभार मानतो. मुंबईत गेल्या महिन्यात जो कार्यक्रम झाला तो मी कधीच विसरू शकणार नाही. दुर्दैवानं तुमची तब्येत बिघडल्यानं तुमची भेट झाली नाही. परंतु आदिनाथ यांनी हा कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या पार पाडला.’

पंतप्रधानांनी या पत्रात पुढं लिहिलं की, ‘जेव्हा मी पुरस्कार घेण्यासाठी उठलो तेव्हा मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. लतादीदींची मला खूप आठवण येत होती. जेव्हा मी पुरस्कार घेत होतो तेव्हा देखील माझ्या मनात लतादीदींचेच विचार होते. त्यावेळी मनात एक विचार आला की, आता मी एका राखीनं गरीब झालो आहे. माझ्याकडची एक राखी कमी झाली आहे. आता माझ्या तब्येतीची काळजीनं चौकशी कोण करणार. माझी चौकशी करणारा आपुलकीचा तो फोन येणार नाही. या पुरस्कारपोटी १ लाख रुपयांची जी रक्कम आहे ती मी एखाद्या सामाजिक संस्थेला देणगी म्हणून देऊ शकतो का? जेणेकरून या रक्कमेतून गरजू लोकांना मदत होईल आणि त्यांचं आयुष्य काही प्रमाणत बदलेल. लतादीदींच्या मनातही हाच विचार आला असता मी पुन्हा एकदा मंगेशकर कुटुंबाचे आभार मानतो आणि लता दीदींना श्रद्धांजली वाहतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here