उद्या २८ मे रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अकोल्यात उड्डाणपुलांचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजपच्या कार्यकाळात १६४ कोटींचा निधी या कामासाठी मंजूर झाला. भाजपने या दोन्ही पुलांचे नाव ‘भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी’ आणि ‘संत कंवरराम’ असे देण्यात आले. भाजप या कामांचं श्रेय घेत असल्याने आता पुलांच्या नामकरणात वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली आहे. वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलांना उद्घटनाआधीच माजी नगराध्यक्ष ‘स्व. विनयकुमार पाराशर’ असं नाव दिलं.
एका पुलावर सुरुवातीला फलक लावण्यात आलं तर दुसऱ्या पुलावर कलरने नाव लिहण्यात आलं. विशेष म्हणजे याआधी वंचितच्या वतीने उड्डाणपुलाला कुणाचं नाव देण्यात यावं यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आलं नव्हतं. या प्रकरणावर पर्दा टाकण्यासाठी आता पोलिसांनी पुलावरील फलक काढलं आहे.
गडकरी साहेब उद्घाटनास आल्यास काळे झेंडे दाखवू…
अकोला शहरातील या दोन्ही उड्डाणपुलांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत आहे. परंतू गडकरी साहेबांनी या उद्घाटनाला येवू नये, असं आवाहन वंचितने पत्रकार परिषदेत केलं. जर गडकरी साहेब उद्घाटन आल्यास याचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे पुलाच्या नावाच्या श्रेयावरून अकोल्यातील राजकारण तापणार आहे हे मात्र निश्चित.