नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्वीपच्या लगतच्या भागात आणि कोमोरिन क्षेत्राच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. ताज्या हवामान संकेतांनुसार, पश्चिमेकडील वारे दक्षिण अरबी समुद्रावरील खालच्या पट्ट्यात मजबूत आणि खोल झाले आहेत. उपग्रहांच्या प्रतिमेनुसार, केरळ किनारपट्टी आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर ढगाळ वातावरण वाढले आहे.
येत्या २-३ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. याच कालावधीत अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात नैऋत्य मान्सूनच्या आणखी काही भागात पुढे जाण्यासाठी पुढील परिस्थिती देखील अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान : कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी कमाला तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे ४२.४ अंश इतके नोंदवले गेले.
Arvind Sawant : मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, पण संभाजीराजेंनी नाकारला