नैनीतालचे एसएसपी पंकज भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बहुगुणा यांच्याविरोधात त्यांच्या सुनेनं पॉस्कोच्या अंतर्गत तक्रार दाखल केली होती. हल्द्वानी येथील पाण्याच्या टाकीवर चढण्यापूर्वी बहुगुणा यांनी ११२ क्रमांकावर फोन केला होता. पोलिसांनी पाण्याच्या टाकीखाली पोहोचून बहुगुणा यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुगुणा यांनी पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडली.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बहुगुणा यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नातीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप सुनेनं बहुगुणांवर केला होता. त्यामुळे ते दु:खी होते. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप लहान मुलीचा जबाब नोंदवला नव्हता. मंगळवारी एका शेजाऱ्यानं बहुगुणांविरोधात एफआयआर नोंदवला. बहुगुणा यांनी शिवीगाळ करून हल्ला केल्याचा, धमकी दिल्याचा आरोप त्यानं केला.
बहुगुणा यांच्या घरात भांडणं सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. बहुगुणा यांचा मुलगा त्याच्या पत्नीशी वाद आहे. त्यामुळे ती घरातच वेगळ्या खोलीत राहते. मुलानं स्वत:च्या पत्नीविरोधात तक्रार नोंदवली आहे. वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा आरोप त्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील, अशी माहिती एसएसपी यांनी दिली.
रोडवेजमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे बहुगुणा ३१ ऑक्टोबरला निवृत्त होणार होते. ते भारतीय मजूर संघ, परिवहन संघ, रोडवेज कामगार युनियन, इंटक मजूर संघाचे नेते होते. एन. डी. तिवारींच्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचा हात धरला. बहुगुणा यांचा स्वत:चा बिझनेसदेखील होता.
शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट चर्चेत