म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :

करोनासंसर्ग पुन्हा वाढत असून पुणे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १.५९ टक्के असला तरी मुंबईमध्ये हा दर ३.१६, तर पुणे येथे २.१६ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

मुंबईमध्ये १२ ते १८ मे या कालावधीत १,००२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, १९ ते २५ मे या कालावधीत १,५३१ नवीन रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. पुण्यामध्ये याच कालावधीत २९७वरून नवीन रुग्णसंख्या ३२९ इतकी झाली आहे. मुंबईमध्ये नवीन रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ, तर पुणे येथे -९.७३ टक्क्यांची घट दिसून येते. ठाण्यातही रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांचा एकत्रित विचार केला असता ३५.८६ टक्क्यांची रुग्णवाढ दिसून येते. इतर जिल्ह्यांमध्ये ही वाढ ३.९६ टक्के इतकी आहे. राज्यामध्ये १२ ते १८ मे या कालावधीत १,६९९ नवीन रुग्णांची नोंद झाली होती, तर १९ ते २५ मे या कालावधीत २,२७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ ३३.९६ टक्के इतकी आहे.

मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या…

राज्यातील सद्यस्थिती

रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण – उपचाराधीन रुग्णांच्या ४.५६ टक्के

सौम्य लक्षणे असलेले रुग्ण – ९६.६५ टक्के

गंभीर रुग्ण – ०.९८ टक्के

आयसीयूमधील रुग्ण – ०.९३ टक्के

व्हेंटिलेटरवरील रुग्ण – ०.०५ टक्के

ऑक्सिजनवरील रुग्ण – ०.८८ टक्के

आयसीयूबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण – ०.०५ टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here