लसीकरणासाठी प्राधान्यगट
भारतात या आजाराचे रुग्ण आढळले तर गर्भवती स्त्रिया, रुग्णाचे घरातील नातेवाईक, निकटच्या संपर्कात असलेले रुग्ण यांच्यामध्ये प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. रुग्णांची तपासणी करताना त्यांच्या तोंडावर, तळहात, तळपायावर व्रण असतील तर त्यांची तत्काळ नोंद करणे गरजेचे आहे. समलिंगी संभोग करणाऱ्या व्यक्तीमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असा प्राथमिक वैद्यकीय अंदाज वर्तवला जात आहे.
Monkeypox Disease : मंकीपॉक्स आजाराचा संसर्ग नेमका कसा होतो? तज्ज्ञ म्हणतात… – monkeypox is contagious for the next four weeks after the onset of symptoms
मुंबई :मंकीपॉक्स हा वेगाने फैलावणारा संसर्गजन्य आजार आहे का, यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये संदिग्धता आहे. ज्या देशांमध्ये या संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहेत, तिथे या आजाराचा प्रसार किती वेगाने होत आहे याचा अभ्यास वैद्यकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. मंकीपॉक्स या आजाराची लक्षणे दिसू लागल्यापासून पुढील चार आठवडे संसर्गजन्य असतो. पण रुग्णाशी अतिशय निकट संबंध आला किंवा रुग्णाच्या स्त्रावाचा थेट संपर्क झाल्यास हा आजार पसरू शकतो.