‘पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदल्या करण्यात येणार नाहीत; परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. उपअधीक्षकपदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. बदल्यांसंदर्भात पारदर्शकता पाळली जाईल,’ असे वळसे पाटील यांनी सांगितले.
Home Maharashtra राज्यात तब्बल १५ जागांसाठी पोलीस भरती: प्रक्रिया कधी सुरू होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली...
राज्यात तब्बल १५ जागांसाठी पोलीस भरती: प्रक्रिया कधी सुरू होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली तारीख – recruitment process will be started from 15th june for vacancies in police force says home minister dilip walse patil
पुणे : पोलिस दलातील रिक्त जागांसाठी १५ जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येतील, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी केली. १५ हजार जागांसाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर भरती (Police Recruitment In Maharashtra) प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.