भंडारा/ नागपूर : उत्तररकाशी येथे यमुनोत्री महामार्गावर बोलेरो गाडी दरीत कोसळल्याने तीन यात्रेकरू ठार झाले. मृतकात विदर्भातील दोघांचा समावेश आहे. जयश्री अनिल कोसरे (रा. तुमसर जि. भंडारा) आणि अशोक महादेव भेंडे (रा. नागपूर) असे मृतकाचे नाव असल्याची माहिती आहे. मुंबईच्या अंधेरी येथील रहिवासी पुरणनाथ यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
या अपघातात जखमी झालेल्या बडवाईक नामक व्यक्तीशी प्रशासनाने संपर्क केला. त्यांच्याकडून घटनेची हकीकत जाणून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत होता.