दुबई- सध्या फक्त भारतातच नाही तर जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक देश आणि कित्येक राज्य लॉकडाउनमध्ये आहेत. या सगळ्यात लॉकडाउनमुळे बॉलिवूड अभिनेत्री गेल्या महिन्याभरापासून दुबईत अडकली आहे. यातच मेघनाला तिचं लग्नही पुढे ढकलावं लागलं.

मेघना पतीशी दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती. मीडिया रिपोर्टनुसार, मेघना दुबईत ज्या ठिकाणी अडकली आहे तिथे कायदे फार कडक आहेत. भारतात जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी लोक सर्रास बाहेर फिरताना दिसत आहेत, तर दुंबईत मात्र याच जिवनावश्य गोष्टी घेण्यासाठी बाहेर जायचं असल्यास परवाना दाखवण्याची सक्ती आहे.

मेघनाने काही दिवसांपूर्वीच टेनिस प्लेअर Luis Miguel Reis शी भारतीय पद्धतीने लग्न केलं होतं. यानंतर मेघना ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार होती. पण आता लॉकडाउनमुळे तिला हा प्लॅन रद्द करावा लागला आहे. ‘कलियों का चमन’ या गाण्यातून प्रसिद्ध झालेल्या मेघनाने काही सिनेमांमध्ये आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here