नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील प्रत्येक जण सध्या स्वतःच्या घरात आहे. बाहेर जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व काही बंद आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसात घरातील एसी, फॅन खराब झाला, किंवा घरातील टीव्ही, फ्रीज या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या तर मोठी अडचण होत आहे. नागरिकांची ही अडचण लक्षात घेता केंद्र सरकारने , प्लंबर अशा काही सेवांना २० एप्रिलपासून परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवल्यानंतर सुधारित नियमावली जारी केली आहे. यानुसार काही बाबतीत २० एप्रिलनंतर सवलत देण्यात आली आहे. संबंधित भाग करोना हॉटस्पॉट नसेल तर या सुविधा मिळणार आहेत. याची खबरदारी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला घ्यावी लागेल.

नियमावलीनुसार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, संगणक दुरुस्ती अशा वस्तूंची दुरुस्ती किंवा कार रिपेरिंगसाठी मेकॅनिक घरी येऊ शकतील. या प्रकारच्या सेवा देणारी दुकाने किंवा कंपन्यांना ही परवानगी देण्यात आलेली नाही. तर जे कामगार स्वतः दुरुस्ती काम करतात त्यांच्यासाठी ही सूट असेल. यामुळे अनेकांचा रोजगार पुन्हा एकदा सुरू होईल.

उन्हाचा तडाखा वाढतच आहे. मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये तापमान ३० ते ४० डिग्रीच्या आसपास आहे. सध्या अनेक जण एसी वापरू शकत नाहीत. शिवाय काही जणांच्या इन्वर्टरची बॅटरी ड्राय झाल्यामुळे ते जास्तीचा भार सहन करू शकत नाहीत. अनेकांनी अजून एसीची सर्विसिंग केलेली नाही. सर्वसाधारणपणे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच एसीची सर्व्हिसिंग केली जाते. पण लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने
केंद्र सरकारने ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न प्रक्रिया उद्योगही सुरू होऊ शकणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत विविध कामे सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. २० एप्रिलपासून ही सूट लागू असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here