मुंबई : करण जोहरचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. बाॅलिवूडचं हे रियुनियनच होतं. इतक्या सगळ्या कलाकारांनी करणनं एका छताखाली आणलं. अनेक वर्ष जे एकमेकांची तोंडही पाहत नव्हते, त्यांना करणनं एकमेकांना भेटवलं. अगदी एक्स गर्लफ्रेंड, बाॅयफ्रेंडही एकमेकांना भेटले. दुरावे संपले. तक्रारी मिटल्या. हे फोटोज, व्हिडिओ पाहून फॅन्स खूप खूश होते.

उर्फी जावेदचं झालंय लग्न? कोण आहेत तिचे पालक, जाणून घ्या तिच्याबद्दल

एक फोटो पाहून तर चाहते अगदी आनंदित झाले. तो फोटो होता शाहरुख खान, सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा एकत्र. या तिघांनी पूर्वी अनेक सिनेमे एकत्र केले होते.या तिघांनी ब्लाॅकबस्टर चित्रपटात काम केलं आहे. आता पुन्हा तिघं एका सिनेमात येतील की नाही माहीत नाही, पण करणनं तिघांचं रियुनियन तरी केलं.

करण जोहरची ही पार्टी यशराज स्टुडिओत झाली. आमिर खान, सैफ अली खान, करिना कपूर, मलाइका अरोरा, प्रीती झिंटापासून कृति सेनन, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर आणि शाहिद कपूर सारख्या स्टार्सनी पार्टीत रंगत आणली. स्टार किड्सही जाह्नवी कपूर, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सारा अली खान यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. साऊथ स्टार्सही हजर होते. विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, पूजा हेगडे सगळ्यांनीच पार्टीची शान वाढवली. तारे जमी पर असं म्हणायला हरकत नाही.

माधुरी दीक्षितनं शेअर केला फोटो

माधुरी दीक्षितनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलाय. त्यात पती श्रीराम नेने, सलमान खान, शाहरुख खान आणि गौरी खान दिसतायत. फॅन्सच्या मते हा आयकाॅनिक फोटो आहे. माधुरीनं कॅप्शन लिहिली आहे, ‘बोलण्यासारखं बरंच काही आहे ना? ‘ फोटोतल्या सगळ्यांना तिनं टॅग केलं आहे.

सर्व लिजंड एकाच फ्रेममध्ये

माधुरीनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तिघांना एकत्र पाहून फॅन्सनी कमेंट केल्या आहेत. एकानं लिहिलंय, ‘सर्व लिजंड एकाच फ्रेममध्ये.’ दुसऱ्यानं कमेंट केलीय, ‘आतापर्यंतचा सर्वात सुंदर फोटो.’ या तिघांना हम तुम्हारे है सनम सिनेमात एकत्र पाहिलं होतं.

शाहरुखच्या सर्व आशा पठान सिनेमावर


बऱ्याच दिवसात किंग खानचा सिनेमा हिट झालेला नाही. त्यामुळे आता सर्व लक्ष पठाणवर आहे. तसंच सलमानच्या टायगर ३ आणि आमिरच्या लाल सिंग चड्ढा सिनेमात तो गेस्ट आर्टिस्ट म्हणून येणार आहे.

सलमान खानही बिझी

सलमान खान

सलमान सध्या कभी ईद कभी दिवाली सिनेमात व्यग्र आहे. टायगर ३ वरही त्याचं सर्व लक्ष केंद्रित आहे. त्याच्या बरोबर कतरिना कैफही आहे.

‘मन्नत’ मध्ये सेलिब्रेशन, अबरामच्या वाढदिवसाला आर्यनला क्लीनचिट

माधुरी लवकरच करणार घोषणा

माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज चाहत्यांना आवडली होती. २०१९ मध्ये तिचा टोटल धमाल सिनेमा आला होता. आता नव्या प्रोजेक्टची घोषणा ती लवकरच करणार आहे.

आर्यन खानला NCB कडून क्लिनचिट; आरोपपत्रातून नाव वगळलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here