मुंबई : अक्षय कुमारची सम्राट पृथ्वीराज सिनेमा येत्या ३ जूनला रिलीज होतोय. याचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. द कपिल शर्मा शोमध्येही अक्षय कुमार, मानुषी छिल्लर दिसणार आहेत. पण अक्कीनं कपिलला भेटायला बोलावलं. आणि तेही कुठे आणि किती वाजता माहितीय का? तर पहाटे ४ वाजता आपल्या जिममध्ये कपिल शर्मा अक्षय कुमारला भेटायला गेला. पहाटे जायचंय म्हणून रात्रभर कपिल जागाच होता. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘रानबाजार’साठी प्राजक्ताने वाढवले ११ किलो वजन, आता करतेय Weight Loss

या व्हिडिओला YRF नं यूट्युब चॅनेसवर अपलोड केलं आहे. कपिल नाइट सुटमध्ये घराच्या गॅलरीत उभा आहे. म्हणतोय, ‘सगळं जग गाढ झोपलंय. खरंच अक्षय कुमार पहाटे ४ वाजता उठतो? आता तर अडीच वाजलेत. मी आता झोपलो आणि उशीर झाला तर आयुष्यभर मला टोमणे मारेल. तयारी सुरू करतो जायची.’ त्यानंतर कपिल तयार होताना दिलतोय. मागून बायकोचा आवाज येतो. ‘इतक्या सकाळी का उठलास? अक्षय पाजीचं शूट आहे का?’ त्यावर कपिल चिडून बोलतो, ‘मग इतक्या पहाटे काय मला एंजलिना जोली बोलवणार आहे का?’

सगळं जग झोपलं आहे

कपिल घरातून निघतो, तर सुरक्षा रक्षकही घोरतोय. कपिल मग स्वत:च गेट उघडतो. कार सुरू होते, तसा कपिल म्हणतो, ‘सगळे कुत्रे, वाॅचमनही झोपलेत. फक्त मी आणि माझी ही माणसं सोडून.’ कपिल शर्मा जिममध्ये पोहोचतो, तेव्हा अक्षय कुमार वर्कआऊट करतोय. अक्षय कपिलचं स्वागत करतो.

कपिलला फुटतो घाम

जिममध्ये गेल्यावर अक्षय त्याला व्यायाम करायला सांगतो. तेव्हा कपिल टेंशनमध्ये येतो. मग तिथे असलेली तलवार पाहून तो सिनेमाबद्दल बोलायला सुरुवात करतो.

तलवार पाहून कपिलला टेंशन

कपिल अक्षय

कपिलच्या हातात अक्षय तलवार देतो. त्याला तलवार कशी चालवायची हे शिकवायचा प्रयत्न करतो. पण कपिल तलवार जमिनीवर फेकून बाहेर पळत येतो. तेव्हा अक्षय मागून ओरडतो, व्यायाम कर. तेव्हा कपिल म्हणतो, ‘आपण सेटवरच भेटू.’ अक्षय कुमारला हसू आवरत नाही.

अमृता फडणवीसांचा ‘कान्स’मध्ये गौरव, प्रेझेन्टेशन देण्याची मिळाली संधी

सिनेमाचं बदललं नाव

करणी सेनेच्या विरोधानंतर सिनेमाचं नाव सम्राट पृथ्वीराज ठेवलं. या सिनेमातून मानुषी छिल्लर पदार्पण करत आहे. शिवाय संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणणारा सरसेनापती हंबीरराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here