औरंगाबाद: विवाहितेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन कथित प्रियकराने तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात समोर आला आहे. प्रियकराने केलेल्या बदनामीमुळे पीडित विवाहितेचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे तिच्यावर जवळपास तीन महिने जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. पीडित महिलेने पोलिस तक्रारीत हा दावा केला आहे. त्यानुसार आरोपी तरुणाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम प्रकरणातून शारीरिक संबंध

वर्षभरापूर्वी पीडित महिलेची ओळख सुधाकर गजानन निकम (रा. बजाजनगर, एमआयडीसी वाळूज परिसर) याच्यासोबत झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर दोघात शारीरिक संबंध निर्माण झाले होते. त्यावेळी सुधाकर निकम याने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना फोटो आणि व्हिडीओ काढले होते.
सुनेच्या आरोपांनी माजी मंत्री व्यथित; टाकीवर चढून स्वत:वर गोळी झाडली
दरम्यान, सुधाकर निकम हा आपल्या जातीचा नसल्याचे सांगत पीडितेच्या वडिलांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे सुधाकर निकम हा पीडितेला तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देत होता. त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी सुधाकर निकम याच्या गावी जावून त्याची कानउघडणी केली होती.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

दरम्यानच्या काळात पीडितेचे लग्न औरंगाबाद शहरात राहणाऱ्या एका तरूणासोबत झाले. सुधाकर निकम याने पीडितेसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्यास सुरूवात केली.

लग्नाच्या दिवशीच एक्स बॉयफ्रेंडनं नवरदेवाला पाठवले नवरीचे प्रायव्हेट फोटो, अन् मग…
हा प्रकार पीडितेच्या लक्षात आल्यावर पीडितेला मोठा धक्का बसला. तिची मानसिक स्थिती खालावल्याने तिच्यावर जालना येथील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर निकम याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळली, चालकाचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here