सूत्रांच्या माहितीनुसार बोनी कपूरच्या क्रेडिट कार्डामधून पाच वेळा ट्रान्झॅक्शन झालं. अकाऊंटमधून ३.८२ लाख रुपये चोरीला गेलेत. या दरम्यान बोनी कपूर यांना कोणाचा फोनही आला नव्हता की कोणी त्यांच्याजवळ क्रेडिट कार्डाची माहितीही विचारली नव्हती. बँक अधिकाऱ्यानं क्रेडिट कार्डाच्या बिलासाठी फोन केला, तेव्हा सगळं उघड झालं. बोनी कपूर यांनी बँँकेशी बोलून आंबोली पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
OMG! एका आयटम साँगसाठी मलायका अरोरा आकारते कोट्यवधींचे मानधन
गुरुग्राम अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेत
पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार बोनी कपूर यांनी जेव्हा क्रेडिट कार्ड वापरलं, तेव्हा त्याचा डेटा काढला गेला. अशीही माहिती समोर आली की त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढले, ते गुरुग्राम इथल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बोनी कपूर यांचं वैयक्तिक आयुष्य

बोनी कपूर बाॅलिवूडचे प्रसिद्ध निर्माता आहेत. मिस्टर इंडिया, जुदाई, नो एंट्री, वाॅन्टेड असे हिट सिनेमे त्यांनी दिले. त्यांचं पहिलं लग्न मोना शौरीशी झालं. त्या लग्नापासून त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला अशी दोन मुलं आहेत. त्यानंतर श्रीदेवीशी दुसरं लग्न केलं. जान्हवी आणि खुशी या दोन मुलीही आहेत. या चार भावंडांचं एकमेकांशी चांगलं पटतं. ते अनेकदा भेटतही असतात. श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूरनंच सगळ्यांना सावरलं होतं.
पहाटे ४ वाजता अक्षय कुमारच्या जिममध्ये पोहोचला कपिल शर्मा, हा Video चुकवू नका!
अफेअरच्या चर्चा