औरंगाबाद : जिल्ह्यातील वाळूज येथे एका गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या दोन महिन्यांच्या गर्भवती असलेल्या २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात आज पहाटे समोर आली. घटनेनंतर घाटी रुग्णालयात नातेवाईकामध्ये एवढी तुंबळ हाणामारी झाली की, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयश्री रितेश पाटील वय-२४ (रा.बाजाजनगर, औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

ओढणीच्या साहाय्याने घेतला गळफास…

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जयश्री यांनी राहत्याघरी सिलिंगफॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जयश्रीला फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत जयश्री यांची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील वैधकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच पॉवरचा दुरुपयोग, हनुमानाने त्यांना सद्बुद्धी द्यावी – नवनीत राणा
रुग्णालयात सासर-माहेरचे भिडले…

जयश्री मृत झाल्याची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने घाटी रुग्णालयातील शवविच्छेदनगृह गाठले. यावेळी नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. वाद वाढू नये आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयश्रीच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जोस बटलर माझा दुसरा नवरा; क्रिकेटपटूच्या पत्नीच्या वक्तव्याने…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here