नवी दिल्ली : भारतात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला तो राज्यात… त्यानंतर सलग काही दिवस केरळमध्ये वाढताना दिसली. परंतु, आता मात्र या संख्येत लक्षणीय घट दिसून येतेय. इथे, प्रत्येक दिवशी आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा एक अंकी संख्येवर आलाय. ज्या लोकांच्या करोना चाचण्या सुरू आहेत त्यादेखील निगेटिव्ह येत आहेत. या राज्यात सुरुवातीपासूनच चाचण्या, तत्काळ परीक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सक्तीनं लागू करण्यावर भर दिला गेला. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाईडलाईन्सनुसार क्वारंटाईनचा अवधी दुप्पट करत २८ दिवसांचा करण्यात आलाय. त्यामुळेच केरळला करोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात बऱ्याच अंशी यश मिळालंय. पण दुसरीकडे महाराष्ट्राची स्थिती मात्र याउलट असल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रात करोनाबाधितांची वाढत जाणाीरी संख्या आणि मृत्यूदर चिंतेचा विषय ठरलाय.

२६ मार्चपर्यंत
– महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या : १२२
– केरळमधील रुग्णांची संख्या : १२०

१२ एप्रिलपर्यंत
– महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या : १९८२
– केरळमधील रुग्णांची संख्या : ३७४

उपचार यशस्वी ठरलेल्या रुग्णांची संख्या ( १२ एप्रिलपर्यंत)
– महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या : २०८
– केरळमधील रुग्णांची संख्या : १४२

करोनाच्या बळींची संख्या ( १२ एप्रिलपर्यंत)
– महाराष्ट्रातील मृत्यू : १४९
– केरळातील मृत्यू : २

एकूण करोना चाचण्या (११ एप्रिलपर्यंत)
– : ३६,७७१ (३४,०९४ निगेटिव्ह)
– केरळ : १४,१६३ (१२,८१८ निगेटिव्ह)

प्रत्येक १० लाख व्यक्तींमागे चाचण्या
-महाराष्ट्र : २९८
– केरळ : ४०१

केरळनं उचललेली महत्त्वाची पावलं
– प्रत्येक नर्स एका आठवड्यात क्वारंटाईन करण्यात आलेल्या २०० घरांमध्ये दाखल होत होती. तब्बल ३० हजार आरोग्य कर्मचारी हे काम करत होते.

– लोकांपर्यंत जेवण पोहचवण्यासाठी राज्यात १२५१ सामुदायिक किचन काम करत होते.

– राज्यातील सर्व जिल्ह्यांवर देखरेख ठेवण्यासाठी २४ X ७ तास कंट्रोल रुम सुरू करण्यात आला. लोकांना नियमांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

महाराष्ट्राचं कुठे कमी पडला?

– ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे डॉक्टर गिरधर आर बाबू यांच्या म्हणण्यानुसार, गंभीर प्रकरणांत उशीर झाल्यानं त्यांच्या उपचार पुरवण्यातही उशीर झाला असू शकतो.

– पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटण्यासाठी लागणारा उशीर

– एक रुपया क्लिनिक सुरू करणाऱ्या डॉक्टर राहुल घुले यांच्या म्हणण्यानुसार, आमचा स्टाफ प्रत्येक घरी जाऊन आठवड्यात १० लाख लोकांचं स्क्रिनिंग करणार होता परंतु, हा प्रोजेक्ट पुढेच सरकला नाही. या प्रोजेक्टसाठी प्रत्येक स्क्रिनिंगमागे ५ रुपयांचा खर्च आला असता

उल्लेखनीय म्हणजे, सध्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २८०१ वर पोहोचली आहे. तर केरळमध्ये आत्तापर्यंत ३८७ रुग्ण आढळलेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here