उस्मानाबाद : परीक्षा केंद्रावर कॉपी करताना पकडल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. उस्मानाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वप्नील ढोबळे हा अॅग्रीकल्चर महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवार (दि.२६ मे) रोजी दुपारी तो पेपरला गेला होता. यावेळी परीक्षा केंद्रात त्याला कॉपी करताना कॉपी परीक्षा विभागाच्या पथकाने पकडले. कॉपी करताना पकडल्याने त्याला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळेच तणावातून त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. ही दु:खद घटना उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथे मध्यरात्री घडली.

विवाहितेचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, एक्स-बॉयफ्रेण्डवर गुन्हा
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील स्वप्निल फुलचंद ढोबळे (वय २१ वर्ष) हा उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील अॅग्री कल्चर महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवार (दि.२६) रोजी दुपारी तो पेपरला गेला होता. यावेळी परीक्षा केंद्रावर आलेल्या कॉपी पथकाने त्याची कॉपी पकडली आणि त्याला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे तो या तणावात होता. वडिलांना कुणी पैसे देऊ नका, बकरा विक्रीवरुन वाद, बापाने मुलाला कुऱ्हाडीने संपवलं
रात्री समुद्रवाणी या आपल्या गावी आल्यानंतर याच तणावातून स्वप्नीलने रात्री स्वत:च्या शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली असता त्याच्या खिशात परीक्षेचे प्रवेशपत्र आढळून आले असून अधिक तपास करण्यात येत आहे. त्याच्यावर शुक्रवारी अत्यंस्कार करण्यात आले. या तरुण विद्यार्थ्याने कमी वयातच आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंबावर व गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे.

तो मिटकरी सोडा, अजित पवारवरही बॅन आणा; नॉनव्हेज प्रकरणानंतर दादांचे खडेबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here