जळगाव : ‘जीना मरना तेरे संग’, या गीताचा नुकताच जळगावात प्रत्यय आला आहे. पत्नीच आपला आधार होती तिचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने तिचे पती यांनीही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाचोरा शहरात उघडकीस आली होती. मृत्यूपूर्वी आजोबांनी चिठ्ठीही लिहली होती. त्यावरुन त्यांचे आत्महत्येचे कारण समोर आले आहे. दोघं वृध्द पती-पत्नी दाम्पत्यांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विष्णू नामदेव पाटील (वय ६५) असे आत्महत्या करणाऱ्या वृध्द पतीचे नाव आहे.

पाचोरा शहरातील घटना…

विष्णू पाटील हे नगरदेवळा येथील मुळ रहिवासी असल्याने शहरात चांगले काम मिळेल या अपेक्षेने पाचोरा शहरातील जारगाव परिसरातील हनुमान नगरातील दिगंबर रामदास अहिरे यांचे घरात गेल्या तीन चार वर्षांपासून भाड्याने राहत होते. किरणबाई ह्या धुनी भांडीकरुन उदरनिर्वाह भागवित होत्या. तर विष्णू पाटील हे गवंडी काम करत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता घरमालक दिगंबर अहिरे यांनी टाकीत पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार सुरू केली. टाकी भरल्यानंतर विष्णू पाटील यांना नळ बंद करण्यासाठी आवाज दिला दोन तीन वेळा आवाज देऊनही विष्णू पाटील बाहेर न आल्याने त्यांचा घरात जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला असता विष्णू पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर किरणाबाई अंथरुणावर मयत अवस्थेत आढळून आले. ही बाब त्यांनी पोलिसांना कळविली.

दुकानावर भगवा स्टीकर असणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करा; सावरकर जयंतीला हिंदू महासंघाची शपथ
मला जीवनात आता कोणाचाही आधार उरलेला नाही…

थकलेल्या अवस्थेत किरणबाई ह्या दुपारी झोपल्या आणि चार वाजता विष्णू पाटील यांनी पत्नीला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता त्या मृत अवस्थेत दिसल्या. यानंतर आपला जीवन जगण्याचा आधारच संपल्याने विष्णू पाटील यांनी कुणाला काही एक न सांगता पत्नीच्या मृत्यूनंतर काही वेळात घराच्या छताला दोर आवळून आपली जीवन यात्रा संपवली. विष्णू पाटील यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीवरुन नेमके कारण समोर आले आहे. घरात खुर्चीवर पोलिसांना चिठ्ठी मिळाली. त्यात, माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याने मला जीवनात आता कोणाचाही आधार उरलेला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आमचे अंत्यसंस्कार कुणीतरी करावेत. अन्यथा नगरपालिकेच्या लोकांना अंत्यसंस्कार करण्यास सांगावे, अशा आशयाची चिठ्ठी विष्णू पाटील यांनी लिहलेली असल्याचे आढळून आली आहे. विशेष बाब म्हणजे किरणबाई ह्या विष्णू पाटील यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच पॉवरचा दुरुपयोग, हनुमानाने त्यांना सद्बुद्धी द्यावी – नवनीत राणा
एकाच वेळी पती-पत्नीवर अंत्यसंस्कार…

पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर विष्णू पाटील यांचे भाऊ व चुलत भाऊ यांच्या वतीने येथील स्मशानभूमीत विष्णू पाटील व त्यांच्या पत्नी किरणबाई यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धमाकेदार ऑफर! फ्लिपकार्टवर खूपच स्वस्तात मिळत आहे आयफोनचे ‘हे’ टॉप मॉडेल; जाणून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here