परभणी : जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी विकास अडकिणे, याचा रोकडेवाडी येथील उत्तम देवकते यांच्यासोबत ऊस तोडणीसाठी दिलेल्या पैशाच्या देवाण घेवाण वरून वाद झाला. यानंतर विकास अडकिणे, याचे अपहरण करून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वशिष्ठ नवघरे यांच्या फिर्यादीवरून दशरथ देवकते, राजू देवकते, उत्तम देवकते, गाडी चालक व इतर दोन अनोळखी ईसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गंगाखेड पोलीस स्टेशन हद्दीतील व पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी तुळशीराम अडकिणे, विकास अडकिणे, नरेश अडकिणे यांनी रोकडेवाडी येथील उत्तम देवकते यांच्याबरोबर कर्नाटक राज्यातील खानापूर येथील लैला शुगर कारखाना येथे ऊस तोडणीसाठी लागणार्‍या टोळीपोटी ७५ हजार रुपये उत्तम देवकते यांना दिले. अडकिने यांनी एक महिना ट्रॅक्टरसह कर्नाटक येथील कारखान्यावर काम केले. पैशांच्या देवाण-घेवाणी वरून त्यांनी काम सोडून रावराजुर येथे परत आल्यानंतर अडकिणे यांनी देवकते यांना पैशांचा हिशोब करून उर्वरित रक्कम मला परत द्या असा तगादा लावला. परंतु देवकते यांनी पैसे परत देणार नाही. पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं म्हणणं बरोबर नाही : श्रीमंत शाहू छत्रपती
विकास आडकिणे यांनी सदरील पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून रावराजुर ते सायाळा रस्त्यावरील टाॅवरजवळ २६ मे रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान विकास आडकिणे व वशिष्ठ नवघरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर विकास अडकिणे यांचे अपहरण करत धारदार शस्त्राने वार करून निर्घूण हत्या करून पुन्हा रावराजुर ते सायाळा रस्त्यावरील टाॅवरजवळ आणून शेतात फेकले. त्यानंतर काल २७ मे रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केलीअसता विकास अडकिणे याचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे वशिष्ठ नवघरे यांच्या फिर्यादीवरून दशरथ देवकते, राजू देवकते, उत्तम देवकते, गाडी चालक व इतर दोन अनोळखी ईसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने हे करत आहेत.

राज्यातील महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here