12 डिसेंबर 2020 पासून त्यांनी किल्ले सर करायला सुरुवात केली. तिथे जाऊन त्यांनी वेगवगळे दगड गोळा केले. त्यानंतर ट्रेकिंग करायला सुरुवात केली ती आजतागायत सुरूच आहे. त्यातच दगड गोळा करण्याची संकल्पना समोर आली. प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दगड नितीन गोळा करून आपल्या सोबत आणतात. लॉकडाऊनमध्ये जे किल्ले फिरण्यासाठी उपलब्ध होते तेवढेच करता आले.
नितीन यांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गोवा, राजस्थान, दीव दमन, गुजरात, उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, हरियाणा अशा दहा राज्यातील किल्ले सर केले आहेत. आपला देदीप्यमान इतिहास डोळे भरून पाहत असताना मनात एक खंत होती. नितीन म्हणतो आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांना संवर्धनाची अत्यंत गरज आहे. नाहीतर आपली पिढी किल्ले पाहील आणि आपल्या पुढच्या पिढीला मातीचे ढिगारे दिसतील.

नितीन भोईटेंनी गोळा केलेले दगड
नितीन भोईटे यांनी किल्ल्यावर गोळा केलेल्या दगडांची नोंद एशिया बुकमध्ये एक रेकॉर्ड आणि इंडिया बुकमध्ये दोन रेकॉर्ड देखील नोंदवलेले आहेत. या दगडांचा वापर आपला इतिहास येणाऱ्या पिढीला सांगण्यासाठी एक संस्था स्थापन करून जनजागृती करण्याचा नितीनचा मानस आहे. त्यातून नक्कीच लोकांना प्रेरणा मिळणार असल्याचे नितीन सांगतो.
प्रत्येक राज्यातील किल्ल्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे दगड मिळतात. कर्नाटकमध्ये मारबल टाइप, यूपी आणि एमपीमध्ये मातीचे, सोलापूर साईड काळे कठीण दगड, राजस्थानला मारबल टाइपचे दगड मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नितीन भोईटे करत असलेला प्रवास हा येणाऱ्या पिढीला नक्की आदर्शवत असा आहे, छत्रपती शिवरायांनी जो पराक्रमी इतिहास आपल्या देशाला दिलाय तो जतन संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे अन् याचीच जाणीव असल्यानं नितीन सारखे मावळे असं वाखणण्याजोगे कार्य करतात त्यांच्या या कार्याला सलाम….!
“इतरांनी चोमडेपणा करु नये”, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर