कोल्हापूर : लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन नदीत कोसळून अपघात झाला. या अपघातात लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जवान जखमी झाले. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील बसर्गे बुद्रुक येथील प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली. गडहिंग्लजमधील प्रशांत जाधव हे २०१४ मध्ये बेळगाव येथे लष्करात भरती झाले होते. सकाळी सातच्या सुमारास लेह स्टेशन येथून सियाचीनकडे बसमधून जवान निघाले होते. श्योक नदीत ही बस कोसळली. या बसमध्ये २६ जवान होते. यातील ७ जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश आहे.

प्रशांत यांचे जानेवारी २०२० साली लग्न झाले होते. त्यांना ११ महिन्यांची मुलगी आहे. प्रशांत यांचे शिक्षण गडिंग्लजमधील जागृती कनिष्ठ महाविद्यालय झाले होते. अतिशय मनमिळावू स्वभाव असणारा, क्रिडा क्षेत्रात त्याला फार आवड होती, अशी भावना प्रशांत यांच्या शिक्षकांनी व्यक्त केली.

शाहू घराण्यानं सत्याची कास सोडली नसल्याचं सिद्ध, संजय राऊतांचं वक्तव्य
नुकतेच २९ एप्रिल रोजी ते सुट्टी संपवून आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. प्रशांत यांच्या निधनामुळे संपूर्ण गडिंग्लज आणि कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. प्रशांत यांची पैरा कमांडो होण्याची इच्छा अपुरी राहिली याची चर्चा गावात सुरू आहे. प्रशांत यांच्या जाण्याची बातमी समजताच गावातील अनेकांनी ‘मिस यु भावा’, असे व्हाट्सअप स्टेटस ठेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

सगळ्यात आधी फडणवीस-संभाजीराजे भेट; त्यानंतर हे सगळं घडलं; शाहू महाराजांचा गौप्यस्फोट

दरम्यान, थोइसपासून २५ किलोमीटर अंतरावर लष्करी जवानांच्या बसला अपघात झाला. जवानांची बस श्योक नदीत कोसळली. बसमध्ये २६ जवान होते. बस ५० ते ६० फूट खोल कोसळल्यानं जवळपास सगळेच जवान जखमी झाले. अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी परतापूर येथील ४०३ फील्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्जिकल टीमला लेहहून परतापूरला पाठवण्यात आलं.

WhatsApp Cashback: ‘या’ युजर्सना WhatsApp देत आहे कॅशबॅक, करावे लागेल हे काम, पाहा डिटेल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here