मुंबई : उष्णतेने अंगाची लाहीलाही होत असताना देशभरात सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने मान्सूनच्या संदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सहा दिवसांच्या मुक्कामानंतर नैऋत्य मान्सूनने दक्षिण श्रीलंकेला व्यापून केरळच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून १ जूनऐवजी २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, तसे मात्र झाले नाही.

केरळमध्ये मान्सून कधी?

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असून दोन-तीन दिवसांत मान्सून तेथे दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. म्हणजेच आता २९-३० मे रोजी मान्सून येऊ शकतो. सर्वसाधारणपणे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जून असते. त्यामुळे २७ मे रोजी मान्सून दाखल झाला नसला, तरी विशेष फरक पडत नाही.

दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप लगतच्या भागात मान्सून सक्रिय आहे आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर तो हळूहळू पुढे जातो, तर २७ जूनपर्यंत दिल्लीत पोहोचतो.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास अनुकूल

IMD ने म्हटले आहे की, हवामानासंबंधी ताज्या संकेतांनुसार, दक्षिण अरबी समुद्रावरील खालच्या स्तरावरील पश्चिमेकडील वारे तीव्र आणि खोल झाले आहेत. सॅटेलाइट इमेजनुसार केरळचा किनारा आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

मान्सून 16 मे रोजी अंदमान निकोबारमध्ये वेळेच्या खूप आधी पोहोचला होता. “चांगली बातमी! 6 दिवस थांबल्यानंतर अरबी समुद्रातून निर्माण होणारा मान्सून पुढे सरकला आहे. मान्सून आता श्रीलंकेत पोहोचला असून पुढील मुक्काम केरळ असेल. दरम्यान, 20 मे पासून बंगालच्या उपसागरातून तयार होणाऱ्या मान्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही” असे ट्वीट युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे संशोधक अक्षय देवरस यांनी केले.

‘ताई खूप हुशार’; सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रणिती शिंदेंना उपरोधिक टोला
स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत ईशान्य भारत, तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम हिमालय आणि दक्षिण तसेच किनारी कर्नाटकाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे

IMD च्या अंदाजानुसार, बिहार, झारखंड, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी ईशान्य राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कुठल्या राज्यात मान्सून कधी पोहोचेल?

10 ते 15 जून: झारखंड, बिहार

5 जून : आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम

10 जून : पश्चिम बंगाल, तेलंगणा, महाराष्ट्र

15 जून : छत्तीसगढ़

20 जून : गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड

25 जून : राजस्थान, हिमाचल प्रदेश

30 जून : हरियाणा, पंजाब

तेव्हा अशीच फिल्डिंग लावली होती, पत्रकारांचा गराडा अन् राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here