कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या भूमीत जाऊन भाजपवर हल्लाबोल चढवला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बघून यांच्या पोटात दुखतं, आम्ही तोंड उघडलं की आमच्या मागे ईडी लावतात, असा आरोप राऊतांनी केला. तर शिवसेनेच्या तिकीटावर राज्यसभेत जाणारे नेते संजय पवार यांना हिंदीत बोलण्याचा सराव करण्याचा मिश्कील सल्ला संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत काय म्हणाले?

“संजय पवार दिल्लीला चालले आहेत. त्यांना म्हटलं हळूहळू जरा हिंदीमध्ये बोलायची प्रॅक्टिस करा, कोल्हापूरची हिंदी मला माहिती आहे, कोल्हापूरच्या सगळ्या खासदारांचं हिंदी ऐकत असतो. आता कोल्हापूरच्या मराठी भाषेचं हिंदी कसं करायचं, हा प्रश्न पडतो. काही शब्द असे आहेत, की त्यांचं हिंदीकरण होत नाही, इंग्रजीकरण होत नाही. कोल्हापूर भारीच आहे.” असं राऊत म्हणाले.

संभाजीराजेंना सन्मानाने शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितलं होतं. सेनेकडून छत्रपती घराण्याचा मान राखण्यात आला होता. मात्र भाजपने कट कारस्थान केलं. शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु होता. भाजपनेच संभाजीराजेंचा गैरवापर केला. परंतु शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा फाडला, पर्दाफाश केला. शाहू महाराजांनी सत्य समोर आणल्यामुळे भाजपची कोंडी झाली, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
Monsoon Update 2022 : मान्सून केरळच्या दिशेने, महाराष्ट्रात पावसाचं आगमन कधी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सुरु आहे, ते विस्कळीत करायचा डाव आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बघून यांच्या पोटात दुखतं, आम्ही तोंड उघडलं की आमच्या मागे ईडी लावतात, सुरु नसलेल्या रिसॉर्टवरुन अनिल परब यांच्यावर धाडी टाकल्या. दापोलीतील रिसॉर्टमध्ये सांडपाण्याचा निचरा होत नाही म्हणून मुंबईत धाडी टाकल्या. ईडीचं काम आर्थिक घोटाळे बाहेर काढण्याचं आहे की सांडपाणी समुद्राला जाऊन मिळतं हे शोधण्याचं, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

शिवसेनेत सामान्य शिवसैनिक खासदार होतो. कोल्हापूरचा आमदार शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही. आघाडीचं बघू, कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार निवडून आणा, असं आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी कोल्हापुरात केलं.

संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही फडणवीसांची कपटनीती | अमोल मिटकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here