अंबरनाथ : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या इसमाला चाकूने भोसकल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथमधील आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगरमधील रोहिदास गल्ली येथे रवींद्र सोनवणे हे ५२ वर्षीय इसम वास्तव्याला आहेत. त्यांच्याच गल्लीत प्रशांत उर्फ बबलू राजगुरू हा २४ वर्षांचा तरुण राहतो. गुरुवारी २६ मे रोजी रवींद्र सोनवणे हे त्यांच्या घरात असताना बबलू तिथे आला आणि त्याने रवींद्र यांना दारूपिण्यासाठी पैसे मागितले. मात्र रवींद्र यांनी त्याला नकार दिल्यामुळे बबलूने त्यांच्या घरातील टीव्ही, स्लायडिंगच्या खिडक्या, पंखा आणि अन्य सामानाची तोडफोड केली.

कोल्हापुरात सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला; दगडफेक करत माजवली दहशत

यावेळी रवींद्र हे बबलूला घराबाहेर काढत असताना त्याने रवींद्र सोनवणे यांच्या पोटात चाकूने ३ वेळा भोसकलं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रवींद्र यांना कल्याणच्या फोर्टीस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी बबलू राजगुरू याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नासह अन्य गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.

बहिणीसोबत अफेअर असल्याचं समजलं; भावाने बॉयफ्रेंडला मागे पळून पळून मारलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here