नवी दिल्ली: यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival 2022) भारतीयांचा जलवा पाहायला मिळाला. केवळ रेड कार्पेटवरच नाही तर अनेक मान-सन्मानही या फेस्टिव्हलमध्ये भारतीयांना मिळाले. यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे दिल्लीकर शौनक सेन याचे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या शौनक सेनने All That Breathes साठी शनिवारी सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री या कॅटेगरीमध्ये L’OEil D’Or पुरस्कार जिंकला. या पुरस्काराला गोल्डन आय पुरस्कार (Golden Eye Award) देखील म्हटले जाते. शौनक सेन हा दिल्लीतल तरुण चित्रपट दिग्दर्शक आहे. शौनकने दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) शिक्षण घेतले आहे.

अमृता फडणवीसांचा ‘कान्स’मध्ये गौरव, प्रेझेन्टेशन देण्याची मिळाली संधी
‘ऑल दॅट ब्रीद्स’ची कहाणी
All That Breathes मध्ये दिल्लीतील दोन भावांची कहाणी दाखवण्यात आली आहे, जे जखमी पक्षी आहेत विशेषत: घारींवर उपचार करुन त्यांचा जीव वाचवतात. डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आले आहे की घारी कशाप्रकारे दिल्लीपासून दूर होत आहेत आणि वायू प्रदुषणामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे.

खास कारणासाठी आदिनाथ ‘कान्स’मध्ये

शौनकला बक्षीस म्हणून मिळाले ४.१६ लाख रुपये
८८ मिनिटांच्या ही डॉक्युमेंट्री ज्युरींना खूप आवडली. दरम्यान गोल्डन आय अवॉर्ड जिंकणारा शौनक सेन दुसरा भारतीय आहे. गेल्यावर्षी हा पुरस्कार पायल कपाडियाची डॉक्युमेंट्री A Night of Knowing Nothing ला मिळाला होता. शौनक सेनला या पुरस्कारासह ५ हजार युरो (जवळपास ४.१६ लाख रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत.

all the breathes

डॉक्युमेंट्रीतील सदस्यांसह शौनक सेन (फोटो: Reuters/epicture.timesgroup.com)

दरम्यान याच वर्षी जानेवारीमध्ये पार पडलेल्या Sundance International Film Festival मध्ये शौनक सेनच्या या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ या डॉक्युमेंट्रीने वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइझ जिंकले होते. हा सिनेमा शौनकने त्याच्या वडिलांना समर्पित केला, जुलै २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले होते. शौनकने २०१९ मध्ये या सिनेमावर काम करण्यास सुरुवात केली होती. शौनकने २०१६ मध्ये डॉक्युमेंट्री ‘सिटीज ऑफ स्लीप’ मधून पदार्पण केले होते. हा लघूपट देखील जगभरातील अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुकास पात्र ठरला होता.

कान्स फिल्म फेस्टीव्हला हजेरी लावण्यासाठी निघाला रणवीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here