मुंबई: अलीकडेच बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drug Case) याला एनसीबीने ड्रग केसमधून क्लीन चिट दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील (Rhea Chakraborty) सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी अभिनेत्रीच्या ड्रग केसची (Rhea Chakraborty Drug Case) पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की ज्याप्रमाणे आर्यन खानच्या केसचा उलगडा झाला, त्याचप्रमाणे रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या केसचा तपास व्हायला हवा.

परदेशात भारतीयाचा डंका! Cannes मध्ये जिंकला गोल्डन आय अवॉर्ड; वाचा सविस्तर

दरम्यान रिया चक्रवर्तीनंतर सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खान प्रकरण देखील पाहिले होते. पण काही काळानंतर त्यांच्या जागी मुकूल रोहतगी आले होते. आता वकील सतीश मानेशिंदे यांची मागणी आहे की आर्यन खान केसमध्ये जशी चौकशी केली गेली, तशीच रियाच्या प्रकरणात देखील व्हावी. कारण रिया आणि शोविक यांच्याकडे अंमली पदार्थ सापडला नव्हता. त्यांची टेस्ट देखील झाली नाही. त्यांनी असे म्हटले की बॉलिवूडमधील अनेक युवकांना एनसीबीने समन धाडले होते, पण कुणाला ते का पाठवले हे माहित नव्हते.

Aryan Khan NCB

सतीश मानेशिंदे रियाबाबत बोलताना असे म्हणाले की, ‘रिया ड्रग्जचे सेवन करत नाही आणि ना ही तिच्याकडे काही सापडलं. तिच्याविरोधात कोणताही पुरावा नाही आहे. फक्त एक WhatsApp Chat, ज्यातूनही काही स्पष्ट होत नाही. त्यांनी पेमेंटच्या रँडम एंट्रीच्या आधारावर केस दाखल केली ज्याची कोणतीच पुष्टी झाली नाही.’ त्यांनी असे म्हटले की ते या केसमध्ये कोणत्याही पॉलिटिकल अँगलवर कमेंट करू इच्छित नाही. ते केवळ वकील आहेत. त्यांच्या मते गेल्या तीन वर्षात एनसीबीने अनेकांना त्रस्त केले आहे. अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी. त्यांनी असेही म्हटले की केवळ WhatsApp Chat च्या आधारे निर्णय घेण्यात आला आणि कोणती टेस्ट देखील झाली नाही.

क्रुझवर ड्रग नेण्याबाबत काय म्हणाला होता आर्यन खान? अरबाझ मर्चंटचा नवा खुलासा

वकिलांची रिया चक्रवर्ती ड्रग केसमध्ये अशी मागणी
सतीश मानेशिंदे यांनी पुढे असं म्हटलं की आर्यनच्या केसमध्ये सर्वांनी पाहिलं आहे की कशाप्रकारे खोटं प्रकरण बनवण्यात आलं होतं. हे सर्व रियाच्या प्रकरणापासून होत आलं आहे. ‘माझी अशी इच्छा आहे सर्व अधिकाऱ्यांविरोधात चौकशी बसायला हवी आणि केस हाताळली जावी’.

Rhea Chakraborty

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती

तीन वर्षांपूर्वी झाली होती रियाला अटक
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर चार दिवसांनी तिचा भाऊ शोविकला देखील ताब्यात घेण्यात आले होते. एनसीबीद्वारे नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सटन्स अॅक्ट, 1985 च्या कलमांअंतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणे, ते बाळगणे आणि अवैध तस्करी केल्याचे प्रकरण दाखल करण्यात आले होते.

रिया is back! रेडिओ मिर्चीच्या ऑफिसबाहेरील व्हिडिओने चाहत्यांचे वेधले लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here