उस्मानाबाद : “शरद पवार साहेब आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. अडचणीच्या काळात डॉ पद्मसिंह पाटील यांनी शरद पवार साहेबांना खूप साथ दिली. चार दशके चांगल्या-वाईट काळात ते एकत्र होते, हे विसरु शकत नाही, त्याचा आदरच आहे, तसेच तेर ही अजितदादाची सासुरवाडी आहे, त्यामुळे हे नाते घट्ट आहे, असं सांगताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या.

स्क्रिप्ट दिल्याचं सांगून छत्रपती घराण्याचा अपमान करू नका; देवेंद्र फडणवीसांवर राऊतांचा पलटवार
सुप्रिया सुळे उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. दौऱ्याची सुरुवात त्यांनी तेर येथील संत गोरोबा काकांचे दर्शन घेऊन केली. मंदिर संस्थानने सत्कार केल्यानंतर खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी गतकाळातील जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१९ मध्ये आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या दोन्ही कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. मात्र आज सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं. यावेळी सुप्रिया सुळे भावुक झाल्या होत्या.
शाहू महाराजांनी बाजू सावरल्यानंतर राऊतांनी घेतली भेट, मुख्यमंत्र्यासोबतही फोनवर चर्चा!
तेर गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तसेच गोरोबा काकाच्या परिसराची दुरावस्था ही अशोभनीय आहे. अजितदादाची तेर ही सासरवाडी असल्यामुळे इथला विकास झाला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी आ. विक्रम काळे, राहुल मोटे, जिवन गोरे, युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संयज पाटील दुधगावकर, महेंद्र धुरगुडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, तेर गावातील नागरिक उपस्थित होते.

संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करायचं होतं पण उडी फसली | संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here