भंडारा : जिल्ह्यात आपल्या वडिलांना क्षुल्लक कारणावरून मुलानेच मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेगळे राहायचा सल्ला देणाऱ्या वृद्ध वडिलांच्या मानेवर मुलाने कुन्हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सोनमाळ येथे रात्रीचा सुमारास घडली असून याप्रकरणी आरोपी मुलाला साकोली पोलिसांनी जेरबंद केले आहे. जानबा गोगलू मेश्राम (७०) असे मृत वडिलांचे नाव आहे, तर देवेंद्र जानबा मेश्राम (३३) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

जन्मदात्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव…

जानबा आणि मुलगा देवेंद्र एकाच कुटुंबात राहत असून रात्री जेवण झाल्यानंतर जानबाने आपला नातू अनिकेत याला ‘तुझी आई सडा सारवण व्यवस्थित करीत नाही त्यामुळे तू आपल्या वडिलांना सांगून वेगळे राहा’, असे सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या देवेंद्रने वडिलांचे बोलणे ऐकले. रागाच्या भरात तो घरातून कुऱ्हाड आणत कोणताही विचार न करता थेट जन्मदात्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. घाव इतका वर्मी बसल्याने वडील जानबा रक्त बंबाळ होत खाली पडून मृत्युमुखी पडले.

RBIचा अहवाल; ५००च्या बोगस नोटांचं प्रमाण १०० टक्क्यांनी वाढलं; नोटबंदीनं काय साधलं?
बहिणीलाही केली मारहाण…

त्यानंतर आरडाओरड होताच पाहुणी आलेल्या बहिण श्यामकला सहारे धावत आली असता तिलाही मारहाण केली आहे. या घटनेची माहिती होताच गावकरी घटनास्थळी धाव घेत साकोली पोलिसांना सूचना देण्यात आली असून आरोपी देवेंद्र मेश्राम याला अटक करत त्याच्या विरुद्ध ३०२, ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. क्षुल्लक राग किती महागात पडतो याची प्रचिती सोनमाळा येथे पहायला मिळाली आहे.

KGFप्रमाणे सोनं निघणार; देशातील सर्वात मोठी खाण सापडली, सरकार खोदकामाच्या तयारीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here