परभणी : पोहायला शिकण्यासाठी धरणातील पाण्यात उतरलेल्या युवकाला प्राण गमवावे लागले. पाण्यात बुडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे ही घटना घडली आहे. तरण्याबांड मुलाचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, तर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

पोहणे शिकण्यासाठी गावाशेजारी असलेल्या मासोळी धरणातील पाण्यामध्ये उतरलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे घडली आहे. संदीप कडवडे असे पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
‘माना हो तुम…’ स्टेजवर गाता-गाता कोसळले, प्रख्यात पार्श्वगायकाचं निधन
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील माकणी येथील संदीप कडवडे या तरुणाला पोहता येत नसल्याने तो गावाशेजारी असलेल्या मासोळी धरणामध्ये पोहणे शिकण्यासाठी जात होता. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे संदीप पोहणे शिकण्यासाठी मासोळी धरणामध्ये उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे माकणी गावावर शोककळा पसरली आहे.

मयत संदीप काडवदे याच्या मृतदेहावर माखणी गावांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हाताशी आलेला तरुण युवक अचानक पणे निघून गेल्यामुळे काडवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धक्कादायक! स्वतंत्र राहाण्याचा सल्ला देणे वडिलांना पडले महागात, मुलाकडून हत्या
नदीत बुडून मामा-भाचीचा मृत्यू

दरम्यान, कुडासे वानोशी परिसरात नदीत बुडून दोन जणांनी आपला जीव गमावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. तनिषा ठाकूर (वय १३) आणि विजय पालयेकर (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. तनिषा ठाकूर ही मूळची हरमल येथील असून ती सुट्टीनिमित्त ताळगाव येथे आपल्या मामाच्या गावी आली होती. विजय पालयेकर हे तनिषा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांसह नदीवर गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले.

‘छत्रपती शाहू महाराजांसोबत भेट राजकीय नाही’; संजय राऊतांचं स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here