पिंपरी :राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की, शेजारच्या घरात जरी पाळणा हलायला लागला तरी हे पेढे वाटतात, अशी खोचक टीका रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. टाळगाव चिखली येथे आमदार महेश लांडगे यांनी सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीला भेट दिली. यावेळी खोत माध्यमांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

यावेळी खोत म्हणाले की, 2014 मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी ही काँग्रेस-राष्ट्रवादीने आणली. ती बंदी उठवण्यासाठीचा पहिला अध्यादेश माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी आणला. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विधेयक आणलं होतं आणि बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला होता.
दोन टर्म आमदारकी, कृषीमंत्रिपदी असतानाच पराभव, भाजपने तिकीट दिलेले अनिल बोंडे कोण?
उच्च आणि सर्वोच न्यायालयामध्ये बैलगाडा शर्यती उठवण्याबाबतची बाजू खऱ्या अर्थाने आमदार महेश लांडगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी समिती नेमली होती, त्याचा रिपोर्ट ग्राह्य धरला आणि बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

ऊस आला की कोल्हा खायला जातो

त्यामुळे ‘उसाला लागलं कोल्हा’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. ऊस आला की कोल्हा तेथे खायला जातो. त्यात काय मला जायचं नाही. त्यामुळे बैलगाड्यावर बंदी कुणी आणली होती, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही खोत यांनी केली आहे.

त्यांनी मोठं मन दाखवलं असेल तर…; चंद्रकांतदादांच्या दिलगिरीवर सुप्रिया सुळे बोलल्या
दरम्यान, सदाभाऊ खोत यांचं नामकरण ‘उपाशी खोत’ असं करण्याची गरज आहे. भाजपच्या वळचणीला जाऊन मंत्रिपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यामुळं काहीच सुचेनासं झालं आहे. आदरणीय शरद पवार साहेब महाविकास आघाडीचे प्रणेते ठरल्यानंच सदाभाऊ खोत पवार साहेबांवर बरळू लागले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मात्र, पवारसाहेबांवर बोलण्याइतपत त्यांची लायकी नाही हे त्यांनी आधी लक्षात ठेवावं,’ अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवेश प्रवक्ते क्रास्टो यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती.

करोनाच्या नवीन व्हायरच्या बातम्या अफवाही असू शकतात किंवा तथ्यही | अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here