मुंबई :राज्यसभा निवडणुकांमध्ये चुरस निर्माण करत भाजपने तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्यापाठोपाठ भाजपने तिसरा पत्ता ओपन केला आहे. राज्यसभेच्या दोन जागेवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येणार आहेत. आता कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेचं तिसरं तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. संभाजीराजे छत्रपतींमुळे गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय पवार आणि भाजपतर्फे धनंजय महाडिक यांच्यात लढत रंगेल.
कोल्हापूरच्या खासदारांचं हिंदी ऐकलंय, संजय पवारांनी हिंदीची प्रॅक्टिस करावी : राऊत
चंद्रकांत पाटील मंत्री यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवला. पण ते पुण्याला गेल्यानंतर सध्या या भागात पक्षाचे नेतृत्व कुणाकडे द्यायचे हा प्रश्न आहे. यातून महाडिक यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. राज्यसभेवर त्यांना पाठवून या भागात पक्षवाढीसाठी त्यांना ताकद देण्याचा पक्षाचा विचार आहे

धनंजय महाडिकच का?

गेल्या काही दिवसापासून महाडिक यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रयत्न करत आहेत. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा पराभव झाला तरी मते मात्र मोठ्या प्रमाणात घेतली गेली. यामध्ये महाडिक गटाच्या ताकदीचाही हातभार लागला. लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीचे तीन मंत्री आणि खासदार आमदार असताना भाजपकडे मात्र जिल्ह्यात एकही मोठे पद नाही. प्रकाश आवाडे हे या पक्षासोबत आहेत. यामुळे महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महाडिक यांना पदाची ताकद देणे आवश्यक वाटत असल्यानेच त्यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे आल्याचे समजते.
भाजपचं सरप्राईज कार्ड! राज्यसभेसाठी दोन नावं जाहीर; अमरावतीतला नेता खासदार होणार
राज्यसभेसाठी सहा जागा निवडून देण्यात येणार आहेत. त्यातील वादग्रस्त सहाव्या जागेसाठी शिवसेनेने प्रथम संभाजीराजे यांना पसंती दिली होती. मात्र त्यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्याने कोल्हापूरचे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याची घोषणा झाली. या पाठोपाठ आता याच जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित केली आहे. राज्यसभेची सहावी जागा सध्या कोल्हापूरभोवती फिरत असल्याने राज्यात कोल्हापूरला राजकीय महत्त्व आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here