IPL 2022 FINAL GT vs RR अहमदाबाद : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील रंगतदार सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या साखली फेरीतील ७० आणि प्लेऑफच्या ३ सामन्यांनंतर या दोन संघांनी अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी विक्रमी गर्दी केली.

आयपीएलने अधिकृत सोशल मीडियात खात्यावरून पोस्ट करून सामना पहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या चाहत्यांची संधी सांगितली आहे. राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ साली विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर राजस्थानचा संघ पहिल्यांदाच म्हणजेच तब्बल १४ वर्षांनी अंतिम सामन्यात पोहोचू शकला आहे, तर दुसरीकडे गुजरात टायटन्स मात्र त्यांच्या पहिल्या सामन्यात अंतिम सामना खेलत आहे.

RR vs GT Final Live Scorecard : गुजरातचा राजस्थानवर ७ गडी राखून दिमाखदार विजय
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका वेळी १ लाख ३२ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आयपीएलच्या अधिकृत माहितीनुसार राजस्थान आणि गुजरात यांच्यातील आयपीएलच अंतिम सामना पाहण्यासाठी १ लाख ४ हजार आणि ८५९ जण मैदानात उपस्थित होते. यामध्ये अनेक सेलिब्रेटी आणि नेतेमंडळी देखील उपस्थित होते. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा देखील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. पंतप्रधानांच्या सुरेक्षेची काळजी म्हणून मैदानात तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारीत २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावल्या आणि यामध्ये १३० धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरला या सामन्यात स्वतःचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही, पण तरी देखील तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. एकंदरीत पाहता गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरवला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने ४ षटकांमध्ये १७ धावा खर्च केल्या आणि ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

‘मला चुकीचं समझू नका’, मृत्यूच्या चार दिवस आधीची सिद्धू मूसेवालाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here