अहमदाबाद : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील फायनलचा सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच एक अशी गोष्ट घडली की त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, हे समजले होते.

सामना सुरु होण्यापूर्वी नेमकं घडलं तरी काय होतं….फायनलचा सामना सुरु होण्यापूर्वी मैदानात एक गोष्ट घडली होती. हा सामना सुरु होण्यापूर्वी गुजरात आणि राजस्थान या दोन्ही संघांचे कर्णधार मैदानात उतरले होते. यावेळी नाणेफेकीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले होते. आतापर्यंत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला जास्तवेळी टॉस जिंकता आला नव्हता. पण फायनलमध्ये त्याने टॉस जिंकला. त्यामुळे आता राजस्थान टॉसनंतर मॅचही जिंकणार असे काही जमांना वाटत होते. पण त्याचवेळी संजूने एक मोठी चूक केली. टॉस जिंकल्यावर संजूने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तोच त्याच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये आपण पाहिले की, जो संघ टॉस जिंकत होता तो प्रथम गोलंदाजी स्विकारत होता आणि सामनाही जिंकत होता. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेणे राजस्थानसाठी चांगले ठरले असते. पण संजूने यावेळी प्रथम फलंदाजी स्विकारत मोठी चूक केली आणि त्यावेळीच क्रिकेटच्या जाणकारांना समजले की हा सामना राजस्थान जिंकण्याची शक्यता कमी आहे.

टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी का घेतली जाते, जाणून घ्या…टॉस जिंकला म्हणजे मॅच जिंकली, असं क्रिकेटमध्ये काही वेळा म्हटलं जातं आणि ते बऱ्याचदा खरं ठरलंही आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सामने दिवस-रात्र खेळवले जातात त्या सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी विजयासमान ठरते. कारण प्रत्येक मैदानात रात्री दव पडत असते आणि त्याचा परीणाम सामन्यावर होतो. कारण दव पडल्यावर चेंडू जड होतो आणि त्याप्रमाणेच तो बॅटवर थेट येतो. त्यामुळे फलंदाजी करणे सोपे होऊन जाते. त्यामुळे कोणताही संघ दिवस-रात्र सामन्यात टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारायचा निर्णय घेतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here