Rajyasabha Election 2022 | ज्यसभेच्या हमखास निवडून येतील अशा दोन जागांसाठी प्रथम भाजपकडून नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे. या दोघांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नव्हते. पण ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यांच्याविषयी मला आनंद आहे.

हायलाइट्स:
- अनिल बोंडेंना भाजपकडून संधी
- सहाव्या जागेवरून भाजपकडून धनंजय महाडिकांना संधी
- पंकजा मुंडेंची संधी हुकल्याची चर्चा
राज्यसभेच्या हमखास निवडून येतील अशा दोन जागांसाठी प्रथम भाजपकडून नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे. या दोघांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नव्हते. पण ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यांच्याविषयी मला आनंद आहे. पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळणे अपेक्षितच होते. अनिल बोंडे यांच्या रुपाने विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या नेत्याला संधी मिळाली, याचा आनंद असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना काही दिवसांत होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजप संधी देईल, अशी चर्चा आहे. याविषयी पंकजा मुंडे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर पंकजा यांनी, ‘विधान परिषदेबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल’, अशी मोघम प्रतिक्रिया दिली.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेसाठी संधी मिळणार?
येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक आणि १० व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस होऊ शकते. यावेळी भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडेही यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. आमच्याकडून त्यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा आहे. अशा काही निवडणुका होतात, तेव्हा त्यांचं नाव चर्चेत येतं. ते साहजिकच आहे. त्यांचं नाव चर्चेत येणं यात काहीच वावगं नाही. त्या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. आमच्या त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. याबद्दलचा निर्णय आमचे हायकमांड घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : bjp leader pankaja munde reaction on rajyasabha election 2022 nomination anil bonde piyush goyal and dhananjay mahadik
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network