मुंबई: दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजहून परतलेल्या धारावीतील एका करोनाबाधित रुग्णाचा मृ्त्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील करोनाने दगावलेल्यांची संख्या ८वर पोहोचली असून धारावीतील करोनाबाधितांची संख्या ६०वर गेली आहे.

धारावीच्या बलिगा नगरसमोरील डायमंड अपार्टमेंटमध्ये राहणारा हा ५५ वर्षीय करोनाबाधित रुग्ण दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाला होता. मरकजहून धारावीत आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली असता त्याला राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले होते. आज त्याची प्रकृती बिघडली असता सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायन रुग्णालयात उपचार सुरू असातना दुपारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील मृतांची संख्या ८वर गेली आहे.

धारावीत आतापर्यंत मुकुंद नगरमध्ये १४, मुस्लिम नगर आणि जनता सोसायटीत प्रत्येकी ७, सोशल नगरमध्ये ६, बलिगा नगरमध्ये ५, शास्त्री नगर आणि कल्याणवाडीत प्रत्येकी ४, वैभव अपार्टमेंट्स, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ आणि मदिना चाळमध्ये प्रत्येकी दोन आणि धनवाडा चाळ, पीएमजीपी कॉलनी, नेहरु चाळ, इंदिरा चाळ आणि गुलमोहर चाळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडलेला आहे. तर मुस्लिम नगर, सोशल नगर, नेहरु चाळमध्ये प्रत्येकी एक तर बलिगा नगरमध्ये तीन आणि कल्याणवाडीत दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here