बारामती : भरधाव वेगाने जाणारा ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे-मोरगाव या अष्टविनायक मार्गावर डायमंड चौक येथे घडली आहे. या ट्रकने चार जणांना चिरडलं असून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सुपे-मोरगाव मार्गावर मध्यरात्री शहा मन्सूर बाबा दर्ग्याजवळ असलेल्या डायमंड हॉटेलमध्ये साखरेने भरलेला ट्रक घुसला. मद्यधुंद अवस्थेतील चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात रुकसाना दिलावर काझी (वय ४५ वर्ष, रा. सुपा, ता. बारामती) या महिलेचा मृत्यू झाला. तसंच दिलावर इस्माईलभाई काझी (वय, ५० वर्ष), सोयल दिलावर काझी (वय २५ वर्ष, दोन्ही रा. सुपा ता. बारामती) आणि मुजाईद अली अहमद अली सय्यद (रा. बिजनोर, ता. धामपूर, राज्य उत्तर प्रदेश) यांना दुखापत झाली. जखमींना सुपे येथील ग्रामीण रुग्णालय आणि केडगाव येथील साई दर्शन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तोंडातून रक्त आणि मानेवर जखमा; बेशुद्ध अवस्थेत फ्लॅटमध्ये आढळली बार गर्ल

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसंच अपघातानंतर बघ्यांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे अधिक तपास करत आहेत.

कोल्हापुरात रिंकू देसाईंच्या घरावर अज्ञातांचा हल्ला; मध्यरात्री तोडफोड ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here