विमानाचा संपर्क तुटल्यानंतर नेपाळच्या लष्कराने विमानाच्या शोधासाठी तातडीने हेलिकॉप्टर पाठवले होते. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने अपघातस्थळाचा शोध घेतला आहे. लष्कराने मुस्तांगमध्ये कोसळलेल्या विमानाचं ठिकाण थसांग-२ सनोसवेअर हे असल्याचे सांगितलं आहे. सैनिक आणि बचाव कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळाचा शोध घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः नेपाळहून निघालेल्या विमानाचे अवशेष सापडले; ४ मुंबईकरांचं काय झालं?
नेपाळचे पोलीस निरीक्षक राज कुमार तमांग यांच्या नेतृत्वाखाली एक पथक विमानाच्या अपघातस्थळी पोहोचले आहे. काही प्रवाशांच्या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तरीही, ही मोहिम सुरुच आहे. रविवारी बर्फसृष्टीमुळं शोध मोहिम थांबवण्यात आली होती. मात्र, आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू केलीये.
विमानाचे अवशेष सापडले
नेपाळी लष्कराच्या पथकाला दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. मानाथी हिमलच्या खालील बाजूस लामचे नदीच्या मुखाजवळ विमान कोसळल्याची माहिती स्थानिकांनी लष्कराला दिली. कोवांग गावात या विमानाचे अवशेष सापडल्याचे नेपाळमधील विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. दहा सैनिक आणि नागरी हवाई प्राधिकरणाचे दोन कर्मचारी यांना घेऊन नेपाळी लष्कराचे हेलिकॉप्टर लामचे नदीकिनारी संभाव्य दुर्घटनास्थळी पोहोचले. मात्र, खराब हवामानामुळे रविवारचे शोधकार्य थांबवण्यात आले होते.
वाचाः गोल्डी ब्रार, लाँरेन्स बिश्नोईवर मूसेवाल्याचा हत्येचा आरोप; या कुख्यात गँगस्टरची कुंडली एकदा वाचाच